शिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्सएज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग म्हणता येईल. शिक्षण घेऊ इच्छिणाNयांसाठी एक नवीन पर्याय आहे असेही म्हणता येईल. या डिस्टन्स एज्युकेशनमुळे जॉब करून शिकू पाहणा-या किंवा एका शाखेतून दुस-या शाखेत शिकू इच्छिणा-यांसाठी ज्ञानाचे एक नवीन कवाड खुले झाले आहे किंवा शिक्षण अर्धवट झालेल्यांसाठी देखील हि सुवर्णसंधी आहे.
मुख्य परीक्षेत निबंध अनिवार्य असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो विषयाला अनुसरून, मुद्देसूद, विविध चर्चाचा ऊहापोह केलेला असावा. मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला अधोरेखित करावं. वर्तमानाचं भान ठेवून सुवाच्च अक्षरात निबंध लिहिला तर नक्कीच चांगले गुण मिळतील. मात्र त्यासाठी कसा सराव करणं आवश्यक आहे, याबाबतची थोडक्यात माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षेत 800 गुणांपैकी 200 गुण - वर्णनात्मक मराठी आणि 100 गुण इंग्रजी असं स्वरूप आहे. या वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरांना नकारात्मक गुणपद्धती नाही. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी मराठी एक चांगला विषय आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर असतो. तोच जर चांगला लिहिला गेला तर `चांगली सुरुवात अर्धे अधिक काम जिंकून देते' याचा प्रत्यय येतोच.
स्पर्धापरीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांच्या अंगी अशाच प्रकारे सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षेची सखोल तयारी करून स्पध्रेत उतरत आहेत. या परीक्षेसाठी बसणार्या विद्यार्थ्यांची संख्या आणि जागेची संख्या यात कमालीची तफावत आहे. मात्र योग्य तयारीने व जिद्दीने स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरले तर यश हमखास आहे. राज्यसेवेची तयारी करताना विद्यार्थ्यांने संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचादेखील विचार करावा. कारण दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम एकमेकास पूरक आहे.
एमपीएससी, युपीएससी याशिवाय बँका तसेच इतर अनेक संस्थांच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी कशी करावी? त्याचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात? याविषयी या परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन...
राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम पाहिल्यास राज्यव्यवस्था आणि शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासन व्यवस्था, सार्वजनिक धोरण हा पूर्वपरीक्षेचा आणि मुख्य परीक्षेला पूर्वपरीक्षेच्या घटकासह जिल्हा प्रशासन शिक्षण व्यवस्था, पक्ष आणि दबावगट, प्रसारमाध्यमे, निवडणूक प्रक्रिया, केंद्र व राज्य सरकारचे विशेष अधिकार व समाजकल्याण कायदे, सार्वजनिक सेवा, सार्वजनिक खर्चावरील नियंत्रण असा व्यापक आहे.
अधिकारी होण्याची सक्षमता उमेदवारात आहे की नाही, याचा अंदाज मुलाखतीत घेतला जातो. उमेदवारामधील आत्मविश्वास, दृष्टिकोन, प्रसंगावधान, चातुर्य, परिस्थिती हाताळण्याची हातोटी, मानसिक कणखरता, संयम, समाजाशी सुसंवाद साधण्याची कला इत्यादीची ही परीक्षा असते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १८६९ उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक होण्याची संधी यावर्षी दिली आहे.
गेल्या 10 वर्षांत प्रशासकीय सेवा परीक्षांविषयी जाणीव जागृती वाढल्यामुळे आणि अनेक विद्यार्थी आपल्या तयारीच्या जोरावर त्यात यशस्वी होऊ लागल्यामुळे आज स्पर्धापरीक्षा क्षेत्र हे एक आकर्षण केंद्र ठरले आहे. परिणामी, प्रशासकीय सेवा, त्या माध्यमातून प्राप्त होणारी नोकरीची शाश्वती, विविध सुविधा, सामाजिक स्थान याबरोबरच आव्हानात्मक करिअर आणि सामाजिक हस्तक्षेपाची संधी या घटकांमुळे विद्यार्थीवर्ग मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षेकडे वळताना दिसून येतो.
एमपीएससी आयोगाने काही दिवसांपूर्वी सहाय्यक पदासाठी परीक्षेची जाहिरात दिली. ही परीक्षा २९ सप्टेंबर २०१३ या दिवशी होणार आहे. पण या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण बदलला आहे. पोलिस सबइन्स्पेक्टर, सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक या पदांच्या परीक्षेसाठी यापूर्वी समान अभ्यासक्रम होता. आता तो बदलला आहे.
नक्कीच एमपीएससी कात टाकत आहे. परीक्षांमध्ये प्रश्नातील तोचतोचपणा संपूर्ण वगळला आहे. त्यामुळे अभ्यास साहित्यामध्येदेखील बदल अपेक्षित आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद केला आहे. त्यातील काही ठरावीक मुद्दयांची आपण चर्चा करूया. शासनाचे विविध विभाग उदा. विक्रीकर, पोलीस इ. विभागात उमेदवारांची निकड भासते, त्या वेळी आयोग विक्रीकर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायक अशा पदांसाठी परीक्षा घेते. अगदी लिपिक या संवर्गासाठीसुद्धा आयोग परीक्षा घेते.
यश प्रत्येकालाच हवं असतं, पण ते मिळवण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणंदेखील आवश्यक असतं. बरेचदा प्रयत्न करूनही यश पदरात पडत नाही. अशा वेळी पदरी निराशा येऊ शकते. पण त्यावेळी आपण केलेल्या चुकांचं निरीक्षण करून त्या चुका पुन्हा न करता अचूकपणे मार्गक्रमण केल्यास यशाची पायरी नक्कीच चढता येऊ शकते. यश मिळवण्यासाठी कुठलेही प्रयत्न करताना काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्यात.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|